Spread the love

चंदगड/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज शिवसेना शिंदे गटाच्या शहरसंघटक पदी काशिनाथ गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. संजय संकपाळ, सुदर्शन बाबर यांच्या हस्ते काशिनाथ गडकरी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार गडहिंग्लज शहरात शिवसेना पक्ष वाढावे या हेतूने शिवसेना तालुका प्रमुख संजय संकपाळ व चंदगड विधानसभा युवासेना प्रमुख सुदर्शन बाबर यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तालुका संपर्क प्रमुख सागर मांजरे, उपतालुकाप्रमुख दत्ता कोरवी,शहरप्रमुख अशोक शिंदे, सागर कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय संकपाळ, सुदर्शन बाबर यांच्या हस्ते काशिनाथ गडकरी यांना गडहिंग्लज शिवसेना शहरसंघटक पदाचे पत्र देण्यात आले. यावेळी शहर समन्वयक राहूल खोत, राहूल औरबोळे, लक्षण पाछापूरे, बाळू पाटील, राजू आजरी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शहरासह सर्व सामान्यांचे प्रश्‍न सोडवू व गडहिंग्लज पालिकेवर महायुतीचा भगवा फडकवू असे सांगितले.