Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहे. वांद्रे इथं हाय सिक्युरिटी असलेल्या इमारतीत सैफचं घर आहे. त्यामुळे हल्लेखोर सैफच्या घरात घुसला तरी कसा असा प्रश्न आहे. त्यामुळे घरातीलच कुणी यात सहभागी असावं अशी शक्यता वर्तवली जाते आहे. घरच्यांनीत घात केला काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. हल्लेखोर घरातच दबा धरून बसला होता. इतकी सिक्युरिटी असूनही सैफच्या घरात तो कसा शिरला याचा शोध सुरू आहे. पोलीस माहिती गोळा करत आहेत. घरातील महिला कर्मचाऱ्याच्या तो ओळखीचा होता असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घरातील चार लोकांना पोलिसांनी तपासासाठी नेलं असल्याची माहिती समोर येत आहे. 3 ठिकाणांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेत. या प्रकरणात एक नाही 3 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एकूण 6 टीम बनवल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत दहिया यांच्या नेतृत्त्वात 3 टीम तर क्राईम बांचचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 3 टीम आहेत. हल्ल्यासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
रात्री दीडच्या सुमारास घरात हल्ला झाला. घरात हल्ला झाल्यानंतर चोराने लहान मुलाच्या रूममध्ये प्रवेश केला. घरातील देखरेखीसाठी असणाऱ्या महिलेनं आरडा ओरडा केल्यानंतर सैफ अली खान धावत आला. धावत आल्यानंतर त्यांने चोरावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली. झटापटीत चोराने चाकूने सैफ अली खान यांच्यावर मानेवर वार केला. यामध्ये सैफ अली खानला दहा सेंटिमीटर चाकूचा वार झाला आहे. त्यांच्या हातावर देखील वार करण्यात आले. हातावर रात्रीच हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली आहे. त्याच्या पाठीत चाकू खुपसण्यात आला, त्याच्यावर स्पाइन सर्जरी सुरू आहे.