नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
डॉकिंग करणारा जगातील चैथा देश हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) गुरुवारी सकाळी दोन भारतीय उपग्रहांना अवकाशात (डॉक) एकामेकांन जोडण्यात यशस्वी झालीय. सकाळी 10 वाजता इसोनं डॉकिंग यशस्वी झाल्याची घोषणा केली. त्यामुळं भारत यशस्वी स्पेस डॉकिंग साध्य करणारा चौथा देश बनलाय. डॉकिंग ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि इसोने पंधरा दिवसांत अनेक चाचण्या करून सावधगिरीनं डॉकिंग करण्याचा प्रयत्न केलाय. भारतानं स्वदेशी विकसित केलेल्या भारतीय डॉकिंग सिस्टीमचा वापर करून हे यश मिळवलं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्त्रो) गुरुवारी ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (SPADEX) अंतर्गत उपग्रह उपग्रहांच्या डॉकिंगची चाचणी
यापूर्वी 12 जानेवारी रोजी, इसोनं दोन अंतराळयानांना तीन मीटर अंतरावर आणून आणि नंतर त्यांना सुरक्षित अंतरावर परत पाठवून उपग्रहांच्या डॉकिंगची चाचणी घेतली होती. इसोनं 30 डिसेंबर 2024 रोजी ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (SPADEX) मिशन यशस्वीरित्या लाँच केलं होतं. इसोनं रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र (SHAR) येथून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (SPADEX) लाँच केलं होतं. या मोहिमेचं यश भारतीय अंतराळ केंद्राच्या स्थापनेसाठी आणि चांद्रयान-4 सारख्या मानवी अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. मिशन डायरेक्टर एम. जयकुमार म्हणाले, 44.5 मीटर लांबीच्या PSLV-C60 रॉकेटमध्ये दोन अंतराळयान, चेसर (SDX01) आणि लक्ष्य (SDX02) होते.
उपग्रह डॉक करण्यात यश
पृथ्वीपासून 475 किलोमीटर उंचीवर अंतराळ कक्षेत दोन भारतीय उपग्रह डॉक करण्यात इसो यशस्वी झाला. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा यशस्वीरित्या डॉक करायला शिकणारा चौथा देश बनला आहे. भारतानं 30 डिसेंबर 2024 रोजी पीएसएलव्ही रॉकेट वापरून स्पेसएक्सईएक्स मोहीम सुरू केली. चंद्रयान-4 आणि भारतीय अंतरिक्ष स्टेशनसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी डॉकिंग ही एक सक्षम तंत्रज्ञान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया X (पूर्वी ट्विटर) वर उपग्रहांच्या अंतराळ डॉकिंगच्या यशस्वी प्रात्यक्षिकासाठी ISRO मधील शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. ”येणाऱ्या वर्षांमध्ये भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे,” असं ते म्हणाले.
डॉकिंग म्हणजे काय…
अंतराळात एका विशिष्ट उद्देशासाठी वस्तूना एकत्र आणण्याची आवश्यकता असते, तेव्हा डॉकिंग आवश्यक असते. डॉकिंग ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे दोन अवकाशातील वस्तू एकत्र जोडल्या जातात. हे विविध पद्धती वापरून करता येतं.