Spread the love

माजी नगरसेवक मोहन कुंभार, माजी नगरसेवक नागेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कुडचे नगर सिमेंट गल्लीत आमदार डॉ.राहुल आवाडे यांनी स्व – खर्चातून कुपनलिका उपलब्ध करुन दिली आहे..या कुपनलिकेचा लोकार्पण माजी नगरसेवक मोहन कुंभार ,माजी नगरसेवक नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

इचलकरंजी येथे कुडचे नगर परिसरातील सिमेंट गल्लीत महापालिकेच्या नळांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.त्यामुळे या परिसरात कुपनलिकेची सोय उपलब्ध करुन द्यावी ,अशी मागणी नागरिकांतून होत होती.याबाबत माजी नगरसेवक मोहन कुंभार ,माजी नगरसेवक नागेश पाटील , ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या सौ.सपना भिसे यांनी आमदार डॉ.राहुल आवाडे यांना माहिती देऊन तातडीने कार्यवाही करावी ,अशी मागणी केली होती.त्यामुळे आमदार डॉ.आवाडे यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन कुडचे नगर सिमेंट गल्लीत स्व – खर्चाने कुपनलिका उपलब्ध करुन दिली.या कुपनलिकेचा लोकार्पण माजी नगरसेवक मोहन कुंभार व माजी नगरसेवक नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रभागातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी प्रभागातील मुलभूत नागरी समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर असल्याची ग्वाही दिली.

यावेळी पुष्पा डंबाळ ,आशा कामत ,ज्योती बाणदार ,सुनिता संकपाळ ,रंजना कामत ,हसीना मकानदार , राजश्री पाटील ,अनिता वालेकर ,सरुबाई हुपरे ,संगिता पाटील ,हबीबा नदाफ ,परवीन कोतवाल ,विजयालक्ष्मी घोळसंगी ,रजिया मकानदार ,लता सुतार ,
आक्काताई सुतार ,गीता सुतार ,शोभा माळी ,लता कुरुंदकर ,रेखा पञावळे ,सिमरन चिंचणे , अंबाबाई पाटील ,प्रतिक्षा ढवळे , शांताबाई घोळसंगी ,मुमताज चिंचणे ,धनश्री संकपाळ ,फातिमा मुल्ला , बंडोपंत कामत ,आनंदा डंबाळ ,तानाजी सुतार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.