भेंडवडे/महान कार्य वृत्तसेवा
भेंडवडे ता. हातकणंगले ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच हनमंत शामराव पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी एकमेव सर्जेराव माने गटाच्या नयुम पठाण यांचा अर्ज आल्याने उपसरपंचपदी नुयम मोहिद्दीन पठाण यांची बिनविरोध निवड झाली.उपसरपंच निवडीच्या सभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक दत्तात्रय देवकाते होते तर अध्यक्षस्थानी सरपंच स्नेहल आभिजित माने होत्या.यावेळी सदस्य हणमंत पाटील, संग्राम माने,रोहन कांबळे,अर्चना माने,उमा वासुदेव,सुप्रिया नरुटे ,यास्मिन पेंढारी,श्रीमती हौसाबई पाटील उपस्थित होते.
निवडीनंतर उपसरपंच नयुम पठाण यांचा युवानेते अभिजीत माने व अतुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शशिकांत माने, अजय कोळी, अक्षय पोवार प्रसाद महेकर, शब्बीर पेंढारी,राजू कोळी,विजय माने,बाबूराव पाटील,आण्णासो रोकडे,राजवर्धन माने,बबलू पठाण,असिफ पकाले,,सचिन नरुटे,दीपक चव्हाण दादासो भुयेकर, विनायक तुपारे , राम पाटील,शिवाजी तुपारे, अनिकेत पाटील, रोहित पाटील, नियाज पठाण,युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.