देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचे वक्तव्य
पुणे/ महान कार्य वृत्तसेवा
”परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. मी इथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही परिस्थिती शांत झाली राजकिय विचार वेगळे असतील पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच. एकट्या मुख्यमंर्त्यांची ती नाही” असे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले आहेत. दिल्ली साहित्य संमेलनातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझा घसा बसला आहे. संजय नहार माझ्याकडे आले आणि आंनदाने हो म्हणालो. इथं आल्यावर नवीन ग्रंथ बघायला मिळतील. स्वागताच, सत्काराच स्वरुप आवश्यक नव्हतं. काकासाहेब गाडगीळ असताना साहित्य संमेलन यशस्वी झालं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायला विरोध झाला तेव्हा मी स्वत: महाविद्यालयात गेलो आणि बाबासाहेबांचे महत्त्व सांगितलं. नामांतराऐवजी नामविस्तार शब्द डोक्यात घातला आणि तो वाद शांत झाला.
मी झोपायला गेलो तेव्हा काचा लागल्या भूकंप झाला. मी सकाळी 7 वा किल्लारीला पोहोचलो. अतिशय विदारक चित्र पाहायला मिळालं. 70 ते 80 गावात संकट होतं. काही दिवस त्या ठिकाणी राहून जनतेला अपील केलं. राज्याच्या काना कोपऱ्यातून सगळे उभे राहिले, असा अनुभवही शरद पवारांनी सांगितला.
रावसाहेब कसबे म्हणाले, शरद पवारांनी फुले, शाहु, आंबेडकारांचा विचार पुढे नेण्याचे काम केलंय. शरद पवारांनी जशी ना.धो. महानोरांना विधानपरिषदेवर संधी दिली तशी पंडीत जवाहरलाल नेहरुंनी कवी दिनकर यांना राज्यसभेवर संधी दिली होती. पंडित नेहरु अनेक कवी संमेलनांना जात असतं…. आताच्या पंतप्रधानांबाबत बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. संमेलनाला कोणी जावे तर ज्याला साहित्य समजते… कविता समजते… तर एकदा पंडीत नेहरुंना कवी संमेलनाला आमंत्रीत करण्यात आलं. स्टेजवर जाताना पंडित नेहरुंचा पाय घसरला तेव्हा कवी दिनकर यांनी त्यांना पकडून ठेवलं आणि पडण्यापासुन वाचवले.तेव्हा पंडीत नेहरु म्हणाले की कवीराज राजकारणात जर माझ्यासकट कुठल्याही राजकारण्याचा पाय घसरला तर आम्हाला असेच सावरा. पंडीत नेहरुंनंतर साहित्यिकांना जर असे सांगण्याच धाडस जर कोणात असेल तर ते शरद पवारांमध्ये आहे.