नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे. ताफ्यात सामील होणारी पुढील प्रमाणे आहेत – निलगिरी, हे प्रोजेक्ट 17ए स्टेल्थ फ्रिगेट अर्थात विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज; सुरत, प्रोजेक्ट 15बी स्टेल्थ डिस्ट्रॉयर श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज; तर वाघशीर, हे स्कॉर्पिन-श्रेणी प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी.
ही ऐतिहासिक घटना भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेला महत्त्वपूर्ण चालना देईल आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये देशाची अग्रगण्य स्थिती अधोरेखित करेल. या तीनही लढाऊ युद्धनौका यांचे आरेखन आणि बांधणी संपूर्णपणे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. या युद्धनौका संरक्षण उत्पादनाच्या महत्वपूर्ण क्षेत्रात भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा पुरावा आहेत. या प्रगत युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडण्याबरोबर संरक्षण उत्पादनात जागतिक प्रमुख म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.