Spread the love

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे रद्द केले होते. यावरून मोठा वाद देखील झाला होता. या सर्व घडामोडीत एका व्यवसाईकाचे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने मोदीचे आवाहन आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा व्यवसाय पणाला लावला होता. आता तीच व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे ते 800 कोटींचा हिस्सा विकणार आहे.
इज माई ट्रिपचे सह-संस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी तातडीने कंपनीचे सीईओपद सोडले आहे. पिट्टी यांनी वैयक्तीक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्यांच्या जागी रिकांत पिट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या कंपनीत कार्यकारी डायरेक्टर आहेत. मालदीव वादाच्या वेळी निशांत यांनी मोदी आणि देशाच्या सम्मानासाठी इज माई ट्रिपवरून मालदीवचे बुकिंग बंद करून टाकले होते. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण देशात कौतुक झाले होते.
निशांत यांनी 1 जानेवारी 2025 रोजी कंपनीचे सीईओपद सोडले आहे. गेल्या सोमवारीच त्यांनी ही घोषणा केली होती. त्याच बरोबर ते कंपनीतील 1.4 टक्के हिस्सा विकणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी शेअर बाजाराला दिली आहे. आपल्या भूमिकेबाबत बोलताना निशांत यांनी म्हटले आहे की, नव्या भूमिकेत रिकांत कंपनीचे नेतृत्व करतील.
कंपनीतील स्वत:चे शेअर विकण्याची निशांत पिट्टी यांची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी म्हणजेच जून 2023 मध्ये 6.25 कोटींचे शेअर विकले होते. तेव्हा निशांत यांनी असे देखील म्हटले होते की, आपण भविष्यात कंपनीचे शेअर विकणार नाही. मात्र आता त्यांनी वैयक्तीक कारण सांगत हिस्सा विकणार असल्याचे म्हटले आहे.