Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकने तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगे केली. बीडमध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिकनं रात्रभरात जेवणच केले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढचे चौदा दिवस कोठडीतून सुटका नसल्याने आता वाल्मिक कोठडीतून बाहेर पडण्यासाठी चोरवाटा शोधू लागलाय. आजारी असल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी वाल्मिक आता धडपड करु लागल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यानं काही सोंगं घेतल्याचा दावाही करण्यात येऊ लागलाय.
तुरुंगातील पहिल्या रात्री वाल्मिक कराडने जेवण केले नाही. सकाळी नाश्ता करण्यासही वाल्मिकनं नकार दिला. पोलिसांच्या आग्रहानंतर वाल्मिकनं आर्धी पोळी खाल्ली. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्यानं वाल्मिकवर औषधोपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला तात्पुरतं ऑक्सिजन कीट लावण्यात आलंय. आजारी पडल्यास वाल्मिकला कोठडीऐवजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जाऊ शकते. त्यामुळे आपण आजारी कसे पडू यासाठी वाल्मिकची धडपड सुरु असल्याचे सांगण्यात येतेय. तब्येत ढासळल्यास रुग्णालयात जायला मिळेल आणि चौकशीपासून लांब पळता येईल यासाठी सगळं काही सुरु असल्याचा आरोप होतोय.