Spread the love

पक्ष संघटनेत होणार फेरबदल

विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
नववर्ष सुरू व्हायला 1-2 दिवस राहिले आहेत. भारतीय जनता पार्टीत मोठे फेरबदल जानेवारी आणि फेब्रुवारीत होणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक फेब्रुवारीत तर 15 जानेवारीपूर्वी महाराष्ट्र, जम्मू काश्मिर, झारखंड, गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात नवे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीत असणार आहेत, असे संकेत प्राप्त झाले. रविवारी दिल्लीत पक्ष संघटनेची बैठक झाल्याचे वृत्त हाती पडले आहे.
रविवारी दिल्लीत पक्षाची बैठक झाली. संघटनात्मक निवडणुकीची चर्चा झाली असं कळाले. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्ष संघटनेचे सरचिटणीस बी.एल.संतोष व सर्व राष्ट्रीय सरचिटणीस संघटना निवडणूक प्रभारी व सहप्रभारी उपस्थित होते.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि निवडणूक अधिकारीही उपस्थित होते असे सांगितले गेले. आरंभी 2019 ला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांना निवडले गेले. आणि त्यानंतर 2020 ला त्यांना अध्यक्ष बनविले. यावरती चर्चा झाली. पक्षाच्या घटनेनुसार दोनच वेळा अध्यक्ष राहता येते.
या बैठकीत जिल्हातंर्गत जे मंडल अध्यक्ष बनवायचे आहेत त्यांचे वय 35 ते 45 निश्चित केले गेले आहे. शिवाय जिल्ह्याचा अध्यक्ष 45 ते 60 वयापर्यंत असावा. जिल्हाध्यक्षांना पक्षात 7 ते 8 वर्ष संघटनेत काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. हे बाकी ठासून सांगण्यात आले आहे. आणि 15 जानेवारीपर्यंत या निवडणुका पूर्ण करावयाच्या आहेत असे ठरल्याचे कळाले. दोन वेळा मंडल अध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला तिसऱ्यांदा स्थान देवू नका असंही ठणकावल्याचे कळते. संघटनेत कोणत्याही पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीलाच जिल्हाध्यक्ष होता येईल, हे केले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना पक्षाच्या घटनेतील कलम 119 अन्वये इलेक्ट्रोल मंडलाद्वारे केली जाणार आहे. त्यात राष्ट्रीय परिषद, राज्य परिषदेचे सदस्य असतील. ही निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणी ठरवून दिलेल्या नियमानुसार घेतली जाणार आहे. अध्यक्ष म्हणून निवडली जाणारी व्यक्ती किमान 15 वर्षे पक्षाची प्राथमिक सदस्य असणे आवश्यक असेल. निवडणुक मंडलाचे 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणुकीसाठी पात्र असलेल्या व्यक्तीचे नाव सुचवतील. पण हा संयुक्त प्रस्ताव किमान 5 राज्यातून आला पाहिजे. त्या राज्यात राष्ट्रीय परिषद निवडणुका झाल्या पाहिजेत. याशिवाय अशा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रातील उमेदवाराची आवश्यकता असते. भाजपाच्या घटनेनुसार किमान 50 टक्के म्हणजे अर्ध्या राज्यामध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जावू शकतो. यावरही येथे चर्चा झाल्याचे कळाले.
5 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात स्थानिक समिती स्थापन्याचाही निर्णय झाला असंही कळाले आहे. सध्या भाजपाची संपूर्ण संघटना राष्ट्रीय ते स्थानिक पातळीवर सुमारे 7 भागात विभागली गेली आहे. राष्ट्रीय स्तर, राष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य स्तर, राज्य परिषद, राज्य कार्यकारिणी, प्रादेशिक समित्या, जिल्हा समित्या, विभागीय समित्या, गाव आणि शहर केंद्रे अशावरही चर्चा झाल्याचे समजून आले. बाकी जानेवारी महिन्यात नव्या निवडी महाराष्ट्रात होणार याचा आरंभ कोल्हापूरातून होवू शकतो असं कळाले आहे.