चंदीगढ/महान र्का वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वी शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने पंजाबमध्ये ’रेले रोको’ आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी शेतकर्यांनी विविध रेल्वे मार्गावर ठिय्या देऊन रेल्वे मार्ग रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा शेतकर्यांनी एल्गार पुकारला आहे. आज किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे.
शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल हे किमान आधारभूत मूल्यासाठी कायदेशीर हमीसह आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी 26 नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मात्र अद्यापही केंद्र सरकारने काहीच निर्णय न शेतकर्यांनी पुन्हा आक‘मक भूमिका धारण केली आहे. शेतकर्यांनी पंजाब बंदची हाक दिली असून सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंत अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक रोखून प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत करणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने 150 ट्रेन रद्द केल्या आहेत. मात्र यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या ट्रेन रद्द?
उत्तर रेल्वेने 3 वंदे भारत एक्स्प्रेससह नवी दिल्ली हून कालका, चंदीगड आणि अमृतसरकडे धावणार्या 3 शताब्दी एक्स्प्रेस आणि पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये धावणार्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यावेळी प्रवाशांना त्रास न होण्यासाठी अंबाला पोलिसांनी दिल्ली आणि चंदीगड दरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांना मार्गे पंचकुला, बरवाला, मुल्लाना, यमुनानगर, रादौर, लाडवा आणि पिपली येथे पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.