पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा; उत्तम जानकरांचा मोठा आरोप
बीड/महान कार्य वृत्तसेवा
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंज संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात रोज नवे अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असून याचा मास्टमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असून सध्या तो फरार आहे. वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जायचा, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे.
उत्तम जानकर म्हणाले, धनंजय मुंडे याचा कर्ता करविता आहे. या सगळ्या प्रकरणामागे ज्याने ताकद दिली तो तेवढाच मोठा गुन्हेगार आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतक्या खंडणी, मारामारी, खून शक्य नाही. रोज एक कोटी घेतल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता. हे बीडच्या सर्व लोकांना माहिती आहे.
वाल्मिकला झोप लागत नव्हती : उत्तम जानकर
एक कोटीला एखादा हजार जरी कमी असेल तरी कोणाचे हातपाय मोडून , खून कर आणि पैसे घेऊन ये असा सांगायचा. एक कोटीला लाखभर कमी असेल तरी वाल्मिकला झोप लागत नव्हती. हा प्रकार राज्यामध्ये घडतोय हा प्रकार एका दिवसात घडला नाही. राजकीय वरदहहस्त असल्याशिवाय एवढे होणारच नाही, असेही उत्तम जानकर म्हणाले .
आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी 16 कॉल
संतोष देशमुख यांचा हत्येच्या वेळी मारहाण केलेला व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागली आहे. आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईल मधील व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.हत्या करून फरार होताना गाडी सोडून फरार आरोपी निघून गेले. यावेळी पोलिसांनी स्कार्पिओ गाडी ताब्यात घेतली. त्यात दोन मोबाइल आढळून आले. सुदर्शन घुले आणि आणखी एका आरोपीचा मोबाईल सापडला. यात महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी 16 कॉल एका वरिष्ठ नेत्याला करण्यात आले होते.
वाल्मिक कराड फरार
देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. एकीकडे राज्यातून या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय असल्येा वाल्मिक कराडला या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. वाल्मिक कराड सध्या फरार असून सध्या सीआयडी आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत.