आजरा/महान कार्य वृत्तसेवा
आजरा येथून जवळच्या अंतरावर असलेल्या चित्री नदीवरील परोली बंधा-यात पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून एकजण पाण्यात आहे.अँड.रुझारीओ अंतोन कुतिन्हो, फिलीप अंतोन कुतिन्हो लाॅईड पास्कोन कुतिन्हो अशी त्यांची नावे आहेत. ख्रिश्चन समाजाची नाताळ सणानंतर सुट्टी असल्याने दुपारी आजरा शहरातील कुतीनो कुटुंबातील तिघेजण पोहण्यासाठी गेले होते. पोहताना तिघेही पाण्याखाली गेल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच आजरा शहर, पोलीस व कासारकांडगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. बंधा-यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.