Spread the love

रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
पश्चिम रेल्वेने बहुप्रतीक्षीत गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मालाड स्थानकात एक एलिव्हेटेड स्थानकाचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या कांदिवली आणि बोरीवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गंतच आणखी दोन मार्गिका जोडल्या जातील ज्या सध्याच्या हार्बर लाईनचा विस्तार असतील.
या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात गोरेगाव ते मालाडपर्यंत 2 किमीचा टप्पा आहे. या पहिला टप्पा 2026 ते 27 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तर. दुसऱ्या टप्प्यात मालाड ते बोरीवलीपर्यंतचा 5 किमीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. हा दुसरा टप्पा 2027 ते 28 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर मालाडजवळ उन्नत विभाग असतील आणि प्रकल्पासाठी अंदाजे 2,731 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. यामध्ये 16 तीन मजली रेल्वेच्या इमारतींचे पाडकाम करण्यात येईल, ज्यामुळे अंदाजे 520 रहिवाशांना याचा फटका बसणार आहे.
2,731 चौरस मीटर जमीनीपैकी 2,535 वर्गमीटर जमीन खासगी असून 196 वर्गमीटर जमीन पालिकेडून हस्तांतरीत करण्यात आली आहे. यातील अधिकांश जमीन मलाड आणि कांदिवली दरम्यान आहे. 16 तीन मजली रेल्वे क्वॉटर्सपैकी 12 कांदिवली पश्चिममध्ये आणि चार तीन मदली क्वॉटर्स मालाड पश्चिममध्ये आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 825 कोटींचा खर्च करण्यात येत आहे.