मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रवाशांना तब्बल 16 तास विमान उड्डाणाची वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबईतून इस्तांबूलला जाणारे सकाळी 6.30 वाजताचे विमान 8 तासानंतर थेट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रवाशांच्या माहितीनुसार, मुंबईहून इस्तंबूलला जाणारं हे विमान शनिवारी सकाळी 6.55 ला टेकऑफ करणार होतं. सकाळी 8.20 पर्यंत विमानाचं टेक ऑफ होईल अस आधी सांगण्यात आलं. त्यानंतर साडे नऊ वाजता सर्व प्रवाशांना बोर्ड करण्यात आलं आणि विमानतळावरच बसवून ठेवलं गेलं. तास-दीड तास बसवल्यानंतर पुन्हा त्यांना एग्जिट घ्या असं सांगण्यात आलं. आता, अखेर साडे सोळा तासांनी रात्री 11.00 वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांनी पुन्हा साडेबारा वाजता विमानात बसवण्यात आलं.हे प्रवास रद्द का? याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांची एयरपोर्ट मॅनेजर आणि इंडिगोच्या मॅनेजरला संपर्क साधण्याच प्रयत्न केला पण अद्याप काही उत्तर मिळालेलं नाही, असं प्रवाशांनी सांगितलं आहे. दरम्यान, या विमानानं 100 प्रवासी प्रवास करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इस्तंबूलमध्ये वातावरण थंड असल्यानं प्रवाशी थंडीचे कपडे घालून विमानात बसले होते पण विमानात बसवल्यानंतर दीड तास विना एसी बसून राहिले. पण आता प्रवाशांना सांगण्यात आलं आहे की हे विमान रद्द करण्यात येत आहे, मिळालेल्या माहितीनुसार कळते आहे.