Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. त्यामध्ये, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर आज अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी,पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीचं कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं. तसेच, माझ्या भावाने सोशल मीडिया बंद केला, आई रात्रभर झोपली नाही, आमच्या कुटुंबाला मोठा त्रास होत असल्याचे सांगत गेल्या दीड महिन्यांपासून मी हे सर्व सहन करत होते. मात्र, एका लोकप्रतिनिधीने माझे नाव घेतल्यामुळे मी आज समोर येऊन बोलत आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले. तसेच, आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी, असेही तिने म्हटले.
गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू आहे. माझ्यावर टीका होतेय पण मी शांत आहे. पण, मी शांत बसते म्हणजे माझी मूकसंमती नाही, असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. आमदार सुरेस धस यांच्या वक्तव्याचा तीवˆ शब्दात निषेध करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे, असेही प्राजक्ता हिने म्हटले. माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्‍न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार कधी गेल्याच नाहीत का परळीला. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, तुम्ही महिला कलाकारांच्या चारिर्त्यावर संशय घेत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर देखील तुम्ही प्रश्‍न उपस्थित करते, असे म्हणत प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच, मी महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केल्याचही प्राजक्त माळीने म्हटले.