Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, असा थेट हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. अजितदादा तुमची काम करण्याची पद्धत ही परखडपणाची असेल तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा असे संभाजीराजे म्हणाले. मला माहित नाही त्यांचा राजीनामा घेतील की नाही. पण बीडच्या सगळ्या जनतेला मला सांगायचं आहे की, त्यांना जर (धनंजय मुंडे) पालकमंत्रीपद दिलं तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व गेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आम्हाला दहशत नाही. दहशत चालत असले तर माझे इथे येणे कर्तव्य असल्याचे संभीजीराजे म्हणाले. बीडचा बिहार करायचा आहे का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी केला.