एकसंबा/महान कार्य वृत्तसेवा
मलिकवाड येथे मशीन ऊसतोड सुरू असताना अचानक विद्युतभारीत तारेला स्पर्श झाल्याने उडालेल्या ठिणगीत येथील आठ एकरातील ऊस जळाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मलिकवाड येथे सकाळी ऊस तोड सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मात्र, अचानक 12 वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरू होताच विद्युत भारित तारेला स्पर्श झाल्याने उडालेल्या ठिणगीने रौद्ररूप धारण करत सुमारे आठ एकरातील ऊसाला घेरले. प्रारंभी सौम्य रुपात लागलेल्या आगीने वार्याचा प्रवाहाबरोबर रौद्ररूप धारण केल्याने नुकसानीला सामोर जावे लागले. यामध्ये संजय पाटील, शंकर खोत बाळासाहेब पाटील, मोहसीन अपराज, सदाशिव शिरोळे, महादेव शिरोळे, संजय खोत, सुभाष शिरोळे आधी शेतकर्यांच्या शेतातील सुमारे आठ एकरावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामुळे लाखो रुपयांचे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.