अर्जुनवाड / महान कार्य वृत्तसेवा
अर्जुनवाड येथील कृष्णा नदी पात्रामध्ये पुला जवळ शनिवारी सकाळी स्त्री जातीचे मृतदेह तरंगताना आढळले. या घटनेची वर्दी अर्जुनवाड पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी शिरोळ पोलिसात दिली.
शनिवारी सकाळी येथील कृष्णा नदी पात्रात दिनकरराव यादव पुलाजवळ स्त्री जातीचे मृतदेह तरंगताना नागरिकांना निदर्शनास आले. येथील पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी माहिती घेऊन याबाबत शिरोळ पोलिसांना वर्दी दिली. सदर स्त्री जातीचे मृतदेह अंदाज 40 वर्षाचे असून अंगावर गुलाबी रंगाचा कुडता परिधान केले होते. यावेळी शिरोळ पोलीस स्टेशनचे पीएसआय गिरीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी बंडगर, पोलीस हवालदार राजाराम पाटील, पोलीस नावजी पाटील, सरपंच नंदाताई खोत, माजी उपसरपंच हेमंत कांबळे, वजीर रेस्क्यू फोर्सचे दशरथ शिकलगार, देवा शिकलगार, शिवराज सोनार यांनी यावेळी रेस्क्यू केले. पंचनाम्यानंतर मृतदेह शिरोळ पोलिसांच्या ताब्यात दिला. शिरोळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.