जरांगेंचा बीडच्या मोर्चातून सरकारला इशारा
बीड/महान कार्य वृत्तसेवा
मी काय करतोय यापेक्षा माझ्या समाजाने काय केलं हे महत्वाच आहे. मी मागे हटणार नाही. माझ्या जातीवर अन्याय केला तर मी सोडत नाही. तुम्ही नाव घेत नाहीत, असा आरोप माझ्यावर केला जातो. तुम्ही कुठे बैठका घेता सर्व माहिती आहे.सुरेश धस एकटेच सर्वांना पुरुन उरतील, असे जरांगे म्हणाले. जो आमदार, खासदार समाजाच्या बाजूने बोलत असेल त्याच्यामागे ठामपण उभे राहायचे. मग तो भाजप, शिवसेना, काँग्रेस कोणाचाही असेना. जोपणे ते आपल्या बाजूने बोलतायत तोपर्यंत समाजाने मागे उभ राहायचं. जे विरोधात जाईल तेव्हा द्यायचं ढकलून असे ते म्हणाले, असे जरांगे म्हणाले.
आरोपीला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. पण सरकारच तुमचं, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. मी येथे भाषण ठोकायला नाही आलो. तिच्या लेकराला बाप नाही. तिच्या पाठीवर हात ठेवा. तिचा बाप गेलाय. भाषण होत राहतील पण लेकीच्या मागे उभे राहा.
आता वाट बघायची नाही. जशाला तसं उत्तर द्या, आपण मराठे आहोत. पाणीच पाजायचं. आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली आहे. आरोपींना पकडणं मोठं गोष्ट नाही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. विरोधक आमचे सासरे नाहीत. आमचं लेकरु गेलंय याच दु:ख आहे. कोणाचेही उपकार विसरायचे नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांवर कमेंट लिहिली म्हणून गुन्हे दाखल केले आणि खून केलेला आरोपी तुम्हाला सापडत नाही? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहखात्याला विचारला. तुम्ही जातीवादी मंत्री पोसणार असाल तर आम्हाला दांडके हातात घ्यावे लागणार आहेत. आम्ही खवळलो तर नाव ठेवू नका. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. काही लोकांना विध्वंस घडवायचा असला तरी आम्हाला तसं करायचं नाही.
माणसाच्या बाजुला मी आणि समाज कायम राहणार. संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी आरोपीना तात्काळ उचला. त्यांना न्याय मिळेपर्यंत एकानेही मागे हटायचे नाही. उद्यापर्यंत ते आरोपीला आत टाकतील आणि न्याय मिळवून देतील, असे जरांगे म्हणाले. हे साप आहेत. यांना पोसू नका. किती पोसलात तरी ते डंख मारणार, असे जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडेना पालकमंत्री पद देऊ नका- संभाजीराजे
म्होरक्याचा आश्रयदाता असलेल्या धनंजय मुंडेना पालकमंत्री पद देऊ नका, असे मी त्यांनी सांगितले. जर धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद दिले तर मी बीडचे पालकत्व घेणार. बीडवर आमचं प्रेम आहे. 19 दिवस झाले आणि आरोपी सापडत नाही.