Spread the love

बंगळुरू/महान कार्य वृत्तसेवा
कर्नाटकमधील बंगळुरूच्या राजराजेश्‍वरी नगर विधानसभेचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एन. मुनिरत्न नायडू यांना बलात्कार प्रकरणात नुकताच जामीन मिळाला आहे. त्यानंतर मतदारसंघात एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले असताना त्यांच्या डोक्यावर काही जणांनी अंडी फेकली. कार्यक्रम आटोपून आपल्या वाहनाकडे जात असताना मुनिरत्न यांच्यावर अंडी ङ्गेकण्यात आले. यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मुनिरत्न यांना सुरक्षितपणे वाहनापयर्ंत नेले. या हल्ल्यानंतर मुनिरत्न यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आपली हत्या करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान बंगळुरू पोलिसांनी या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.