शहर/प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाकडील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या १८ वारसाना अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त स्मृती पाटील, सहा.आयुक्त विजय राजापुरे, कार्यालयीन अधिकारी प्रियांका बनसोडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देणेत आले.
इचलकरंजी महानगर पालिकेकडे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू आहे. या अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृती घेतली होती अशा कर्मचाऱ्यांच्या १५ वारसांना गत आठवड्यामध्ये महापालिकेने सेवेत सामावून घेतले होते तर आज पुन्हा १८ वारसांना महापालिका सेवेत सामावून घेतले आहे सदर कर्मचाऱ्यांना नेमणुकीचे पत्र वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी नियुक्त करणेत आलेल्या सर्व नुतन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रामाणिक पणे आपले काम करावे असे आवाहन केले. या प्रसंगी महानगरपालिका कर्मचारी युनियनचे नौशाद जावळे, चंद्रकांत कोठावळे, संजय शेटे, रोहित रजपुते, प्रमोद कामत, दिपक खोत यांचेसह सुनील शिंदे, राम कांबळे, अजय जाधव, संध्या आदवाने तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.