Spread the love

शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा
तहसीलदार कार्यालयासमोरून मोठ्या प्रमाणात माती वाहतूक सुरु होती. त्या माती वाहतूक करणार्‍या वाहनांकडे वाहतूक परवाना पावती मागितल्यास त्यांनी 26 तारीख असताना 25 तारखेची पावती त्यांच्याकडे होती आणि कालच्या रॉयल्टीवर वाहतूक सुरु असून सोबत जोडलेल्या वाहनाबरोबर अन्य चार मोठी वाहने माती भरून जात होती. रॉयल्टी चुकवून जाणारी ही वाहने तात्काळ परत बोलवून याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.