कोथळी/महान कार्य वृत्तसेवा
कोथळी (ता. शिरोळ) येथील कोथळी ग्रामपंचायतीकडून सन 2024 ते 25 या कालावधीसाठी घरपट्टी वसुली चालू केली आहे. तिची आकारणी मागील वर्षापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. नागरिकांना ही घरपट्टी भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड ज्यादा बसत आहे, त्याचबरोबर शेजारील शहर व गावे यांच्यापेक्षाही ही घरपट्टी अवास्तव आहे, असे निवेदन कोथळी येथील ग्रामस्थांनी कोथळी ग्रामपंचायतीस दिले आहे. अवास्तव घरपट्टी कमी करावी व घरपट्टी वाढीसंदर्भात सविस्तर चर्चा करून याची माहिती ग्रामस्थांना द्यावी याविषयी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत वसुली थांबवावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यावेळी तेजपाल मुदकान्ना, बिपिन पाटील, सतीश पाटील, संदीप पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.