मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
लाडकी बहीण योजनेबाबत रोज काही ना काही अपडेट येत आहे. डिसेंबर महिन्यात सहावा हप्ता येणार होता, मात्र आता मकर संक्रांतीदरम्यान सहावा आणि सातवा दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सहावा हप्ता मिळण्यासाठी आता आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसरीकडे काही महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता या महिलांच्या खात्यावर येणार नाही. त्या लिस्टमध्ये तुमचं तर नाव नाही ना तेही एकदा चेक करून पाहायला हवं, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली. ही योजना महाराष्ट्रासोबत आणखी 9 राज्यामध्ये राबवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यावर जमा होतात. बजेट 2025 नंतर ही रक्कम वाढून 2100 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी दिली. ज्यांना पाचवा सहावा हप्ता मिळाला नाही त्यांचे हप्ते तिन्ही मकर संक्रांतीपयर्ंत येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापूर्वी राज्यात पुन्हा अर्जाची छाननी केली जात आहे.
तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. तुमचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, तुम्ही टॅक्स भरत असाल, तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सेवानिवृत्तीनंतर सरकारी पेन्शन येत असेल, अर्ज केलेल्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी नोकरीत असेल तर तिचा अर्ज बाद केला जाणार आहे.
एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे पूर्वीसारखा आता सरसकट लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत अनेक ठिकाणी ङ्गसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर निकष आणि नियम अधिक कठोर करण्यात आले. त्यानंतर आता कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपयर्ंत होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर उर्वरित हप्ता दिला जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
