भिकाजी कांबळे/महान कार्य वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केले. राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी संधी देऊन कोल्हापूरकरांना एक जबरदस्त धक्का त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आ.प्रकाश आबिटकर यांनी कोणताही विचार न करता शिंदे यांना बळ दिलं. त्यावेळी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अडीच वर्षापुर्वी त्यांना मंत्री केलं जाईल, अशी धारणा होती. परंतु ती संधी त्यांना मिळाली नाही. निवडणुकीपुर्वी गारगोटी येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी प्रकाशला विधानसभेत पाठवा त्यांना मंत्री करतो, असा शब्द दिला होता. आणि तो आज त्यांनी सत्यात उतरवुन दाखविला. त्यामुळे शब्दाला जागणारा नेता, असे बोलले जात आहे.