चोकाक / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून नागरिकमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अनेक वेळा कुत्री अंगावर येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे मोकाट कुत्र्यांची संख्या जादा असल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत रस्त्यावरून मार्ग शोधत जात आहेत ग्रामपंचायत प्रशासन मोकाट कुत्र्यांचा कधी बंदोबस्त करणार असं नागरिकांमधून बोललं जात आहे.