कबनूर/महान कार्य वृत्तसेवा
येथील झेंडा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे अशी मागणी कबनूर मधील समस्त शिवप्रेमींनी आमदार राहुल आवाडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. कबनूर गावची लोकसंख्या 70 हजाराच्या आसपास आहे.मात्र गावात महाराजांचे स्मारक नाही.मागील गावसभेत सदरचा ठराव मंजूर करण्यात आला असून पुढील काम आपणाकडून लवकरात लवकर व्हावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विनायक गुंडकल्ले, दत्तात्रय पाटील,सागर कोले,रवी धनगर,प्रशांत भिउंगडे,महेश शिवूडकर,मुकुंद उरूनकर,बबलू सनदी आदी उपस्थित होते.