ज्येष्ठ पत्रकार डॉ.दशरथ पारेकर; इचलकरंजीत पत्रकारांनी केला सत्कार
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात वृत्तपत्रे आणि वृत्तसमूहामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली असली तरी “ए आय तंत्रज्ञान” पत्रकारांसारखे काम करू शकणार नाही मात्र माध्यमे आणि माध्यम प्रतिनिधींना तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावेच लागेल असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर यांनी व्यक्त केले
वृत्तपत्रातील अग्रलेखांच्या विषयावर प्रबंध सादर करून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचेकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत ,पत्रकार डॉ दशरथ पारेकर यांचा सत्कार श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आला. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी स्वागत केले. यावेळी अध्यक्ष अतुल आंबी, समाजवादी प्रबोधनीचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष बसवराज कोटगी यांनी मानले. डॉ.दशरथ पारेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक बाबींचा उलगडा केला, विविध देशांमध्ये असलेली वृत्तपत्रांची स्थिती आणि भारतीय पत्रकारिता याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
पत्रकार संघटनांची आवश्यकता, शासनाचे धोरण, वृत्त समूहांची व्यावसायिक बदलती भूमिका , झपाट्याने वाढणारे तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा बेसुमार वापर अशा परिस्थितीत काम करताना पत्रकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, भविष्यात धोके वाढणार आहेत, हे ओळखून तंत्रज्ञानाशी आपल्याला जुळवून घ्यावेच लागेल असे सांगत त्यांनी आपला जीवनप्रवास अगदी मोजक्या शब्दात व्यक्त केला, डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला सत्कार इचलकरंजीच्या पत्रकारांनी केला याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी स्वागत केले. यावेळी अध्यक्ष अतुल आंबी, समाजवादी प्रबोधनीचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष बसवराज कोटगी यांनी मानले.