Spread the love

कोंडीग्रे महान कार्य वृत्तसेवा
कोंडीग्रे ग्रामपंचायतच्या दारात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पडलेला आहे. यामुळे गावात दुर्गंधी पसरले असून, ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंगळवारी, उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमाच्या वेळी या ठिकाणी ग्रामस्थांसोबत प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. तरी देखील, कचऱ्याचा ढीग त्यांच्याही नजरेस पडला नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कचरा साचल्यामुळे गावात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे आरोग्य समस्याही निर्माण होत आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे आणि ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करून कचऱ्याचा निपटारा करावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.