Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यावतीने सबज्युनियर धनुर्विद्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आदर्श विद्यानिकेतन मिणचे येथे पार पडल्या. या स्पर्धेतून इंडियन राऊंड प्रकारामध्ये कु. स्वस्तिक सिताराम शिंदे (इ. 10 वी) याची कोल्हापूर जिल्हा संघामध्ये निवड झाली आहे. या खेळाडूची नाशिक येथे होणार्‍या राज्यस्तरीय सब ज्युनिअर आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.