यड्राव : महान कार्य वृत्तसेवा
सर्वांचा लाडका आणि मित्रमंडळींमध्ये हसतमुख असलेला भागेश कृष्णा धुमाळे यांचे दुःखद निधन झालं. अवघ्या 17 वर्षांच्या वयात, तो प्रत्येकाच्या हृदयात घर करून होता. त्याची हसरी वावरणे, मित्रांशी गप्पा मारणे, शिवजयंतीला उत्साहाने भाग घेणे, आणि सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होणे यामुळे तो सर्वांचा लाडका होता. एक हरहुन्नरी तरुण हरपल्याने सर्वांच्या मनाला त्याची एक्झिट चटका लावून देणारी आहे
आज सकाळी त्याने नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता त्यानंतर घरी परतत असताना इचलकरंजी येथील गांधी पुतळ्या जवळ मित्रांसोबत येत असताना अचानक त्याला फिट आले. तो जागीच कोसळला. मित्रांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याच्या शरीरातून जीवनाची प्रकाशरेखा हळूहळू ओसरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कट्टर अनुयायी होता. शिवजयंतीला उत्साहाने भाग घेत, दुर्गामाता दौडमध्ये नेहमी अग्रभागी असायचा.
आज त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना असा एक वज्राघात केला. त्याचा मृतदेह पाहताच आई-वडील व भावाने केलेला आक्रोश हा हृदय पिवटून टाकणारा होता. त्याचा अचानक निघून जाणारा प्रपंच, त्याची जीवंत स्मृती आणि त्याच्या गोड आठवणी मनावर गहिरा ठसा सोडत आहेत. त्याच्या पश्चात वडील आई भाऊ व वहिनी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी 12 रोजी यड्राव स्मशानभूमी येथे आहे.