Spread the love

हातकणंगले/संतोष पाटील
हातकणंगले शहरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मंजूर झाला आहे. परंतू, नगरपंचायतीकडे प्रकल्पासाठी आवश्यक जागाच नसल्यामुळे हा प्रकल्प होणार की नाही? याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या प्रकल्पासाठी कोण जागा देता का जागा? अशी हाक देण्याची वेळ नगरपंचायत प्रशासनावर आली आहे. त्यामुळे जागेसाठी शेतकर्‍यांकडे नगरपंचायतीवर भीक मागण्याचा प्रसंग ओढावला आहे.

राज्य सरकारने महामार्गालगतचे बिअरबार, दारू दुकानांवर आणि हायवेलगतचे 2 नंबरचे धंदे बंद करण्याचा फतवा काढला. या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरु झाल्याने 2 नंबर वाल्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे काही राजकीय लोकांना हाताशी धरुन धंद्याचे बस्थान बसविण्यासाठी नगरपंचायत स्थापण करण्यासाठी प्रयत्न चालू झाले. त्यात यशही आले. 5 वर्षापुर्वी नगरपंचायत स्थापण झाली. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कायदे रद्द झाले आणि पालिकांचे कायदे हातकणंगले शहरासाठी लागू झाले. अनेक भुखंडांवर आरक्षण टाकण्यात आले. परंतु हे करीत असताना भविष्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करण्याची गरज आहे, याचा विचार केला गेला नाही. आणि यासाठी आरक्षणही टाकण्यात आलं नाही, त्यामुळे आता नगरपंचायतीला शेतकर्‍यांच्या जमिनी वाटाघाटीने मिळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.