हातकणंगले/संतोष पाटील
हातणकणंगले- पेठवडगाव मार्गावर दररोज सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सांगली- कोल्हापूर मार्गावरीलही वाहतुकीचा बोर्या वाजला आहे. दुपारनंतर गौनखनिज वाहतूक करणारे डंपर मोठ्या संख्येन या मार्गावरुन सुरु होत असल्याने रस्त्यावर वाहतुकीची अतिरिक्त ताण पडत आहे. या गंभीर प्रकाराकडे हातकणंगले पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगली-कोल्हापूर मार्गाच्या अर्धवट काम आणि खराब रस्त्यामुळे सकाळपासूनच या मार्गावर वाहतुकीची कोंडी सुरु असते. शिरोलीमार्गे, मुंबई, पुणे, सातार्याकडे जाणार्याच्या वाहनांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सोयीचा मार्ग म्हणून पेठवडगावमार्गे ही वाहने मार्गस्थ होत असता. मात्र सध्या पावसाळा संपल्याने हातकणंगले परिसरात मोठ्या प्रमाणात गौनखनीज उत्खनन सुरु आहे. त्यामुळे मोठे डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली आदी गौनखनीज वाहतूक करणार्या वाहनांची मोठ्या प्रमाणा या मार्गावर वर्दळ आहे. याचा विपरित परिणाम नियमीत वाहतुकीवर होत आहे. दुपारी चार नंतर वाहनांची गर्दी होते. पेठा भागात तर तास तास भर वाहनांच्या एक ते दोन किलोमीटर रांगा लागलेल्या असतात. विशेष म्हणजे रुग्णवाहिकांनी जाण्यासाठी रस्ता नसतो. दररोजच्या या कटकटीने नियमित प्रवास करणार्या वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.