Spread the love

तीन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी

मिरज/महान कार्य वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील कुख्यात गुंड म्हमदया उर्फ महम्मद नदाफ राहणार सांगली याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाकडून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे.पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि त्यांचे पथक गेल्या तीन महिन्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या अनुषंगाने ऍक्शन मोड मध्ये आले असल्याचे दिसून येत असून‌ गुंड महमद्या नदाफ आणि रुकसाना शेख-जमादार यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी येरवडा जेल पुणे येथून त्याचा ताबा मिळवला आहे.तर रुकसाना शेख- जमादार यांनी या अगोदरच अटकपूर्व जामीन घेतला आहे व या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत तर याबरोबरच शहरातील घडलेल्या इतर गुन्ह्याबाबत पोलिसांनी तपास अधिक तीव्र करून कसून तपास करत आहेत.