घर फाळा वसुलीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर, सोमवारपासून वसुलीची धडक मोहीम
प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा-
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील मिळकतींचा घरफाळा वसुली ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये निम्म्यावर आली आहे. निवडणूक कामासाठी घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्याचा परिणाम घरफाळा वसुलीवर झाला आहे. सोमवारपासून महापालिकेच्या वतीने घरफाळा वसुलीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. घरफाळा विभागाचा एक क्लाकी, एक शिपाई यांच्यासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती कर अधीक्षक स्वप्नील बुचडे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने घरफाळ्या वर आकारण्यात येणाऱ्या त्रे मासिक व सहामाहीमध्ये आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये सवलत दिली होती. त्याची मुदत संपत आली असून जानेवारीमध्ये पुन्हा दुसऱ्या सहामाहीच्या दंडाच्या रकमेची आकारणी होणार आहे त्यामुळे मिळकत धारकांनी घरफाळ्याच्या वसुलीसाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करून थकबाकीची रक्कम भरावी जप्तीसारखे कटू प्रसंग टाळावेत. – स्वप्निल बुचडे, कर अधीक्षक
इचलकरंजी महानगरपालिका
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीमध्ये 63 हजार 24 मिळकती आहेत. सदर मिळकती पासून घरफाळ्यापोटी 71 कोटी तर पाणीपट्टी 26 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला मिळत असतो. सदर रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेच्या वतीने एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या तीन व सहा महिन्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवर सूट जाहीर केली होती.त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असतानाही घरफाळा वसुलीवर याचा काहीही परिणाम जाणवला नव्हता. घरपळा रकमेवर मिळणाऱ्या सवलतीमुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरफाळा भरण्यास पसंती दाखवली होती. त्यामुळे महापालिकेकडे महिन्याला सुमारे चार ते पाच कोटीचा घरफाळा व पाणीपट्टी वसुली होत होती.परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये महिन्याला होणाऱ्या पळावर पाणीपट्टीच्या वसुलीमध्ये घट होऊन ती निम्म्यावर आली आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नागरिकांनी घर पाळा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याने महापालिकेच्या घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेचा घरफाळा विभाग पुन्हा ॲक्शन मोडवर आला असून सोमवारपासून महापालिकेच्या वतीने घरफाळा वसुलीसाठी वार्डनिहाय वसुली पथकांची निर्मिती केली आहे. सदर पथकांमार्फत वसुली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. सुरुवातीला थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले जाणार असून त्यानंतर ही घरपण्याची थकबाकीची रक्कम भरली नाही तर मालमत्ता जप्ती करण्याची तयारी महापालिकेकडून केली जात आहे.
1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत घरफाळ्यापोटी सुमारे 21 कोटी रुपये .तर पाणीपट्टीपोटी एक कोटी तीस लाख रुपये वसुली करण्यात आली होती. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये घरफाळा 1.67 कोटी व पाणीपट्टी 60 लाख रुपये तर नोव्हेंबर महिन्यामध्ये घरफाळा एक कोटी एक लाख तर पाणीपट्टी 60 लाख रुपये वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी 25 कोटी 50 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.