Spread the love

गंगानगर/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील गंगानगर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू सन 2024-2025 या गळित हंगामात गळितास येणार्‍या ऊसाला प्रतिटन 3300 रुपये प्रमाणे एकरकमी, विना कपात दर देण्याचा निर्णय घेतल्याचे चेअरमन पी.एम.पाटील यांनी जाहीर केले. ते म्हणाले, कारखान्याने मागील गळित हंगामात ऊसाला उच्चांकी दर देवून संपूर्ण रक्कम वेळेत आदा केली आहे. सध्या कारखाना पुर्ण क्षमतेने चालू आहे. चालू गळित हंगामाकरिता कारखान्याकडे 11 हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून कारखान्याने यावर्षी 10 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला सर्व ऊस या कारखान्यास गळितास पाठवून सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन पाटील यांनी केले. यावेळी रेणुका शुगर्सचे असोसिएटस् व्हा. प्रेसिडेंट प्रकाश सावंत, असि. डे. जनरल मनेंजर केन सी. एस. पाटील, व्यवस्थापक शिरीष रासनकर, केन मॅनेजर प्रशांत चांदोबा, कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे आदि उपस्थित होते.