प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज बाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवला आहे. यामुळे कामगारांना अर्ज भरणे साठी तालुक्याला मंडळाने ठरवलेल्या ठेकेदाराकडे जावे लागणार आहे. हे बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ नसून ठेकेदारांना व मंत्र्यांच्या बगलबच्चन पोहोचण्यासाठी तयार केलेल्या मंडळ असा संशय येत असलेचे संयुक्त बांधकाम कामगार कृषी समिती च्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाला बैठकीचे अध्यक्षस्थानी कॉ आनंदा गुरव हे होते. मंडळाचे संपूर्ण कामकाज कोलमडून पडले आहे
केवळ तालुकास्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच अर्ज सादर करण्याची अट आहे. येथे रोज पन्नास कामगारांची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथे प्रत्यक्ष कामगारांचे कामे होत नाहीत. हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत. कामगारांच्या विविध योजना पेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी खर्च केले आहेत. हे केवळ मंडळाच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे.
यावेळी कॉ. आनंदा गुरव, गणेश तडाखे, संजय खानविलकर, राजेंद्र निकम, जयप्रकाश कांबळे, महेश लोहार, आकाश बनसोडे,अभिजीत आवळे, सचिन भोरे, राहुल दवडते, राहुल शिंदे, सचिन खाडे, भीमराव जामकर, तोफिक नायकवडी, दीपक रेपाळ, अण्णा हालगेकर, अजय रेडे, सदाशिव यादव, अनिल जाधव विकी माने, भैय्यासाहेब धनवडे आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते