Spread the love

आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे, संभाजी निंबाळकर, वैभव कोळी यांना पोलिसांचा अटकाव

वार्ताहर/महान कार्य वृत्तसेवा
चालू वर्षीच्या गळीत हंमागाचा दर न जाहीर करीता ऊसतोडी करून ऊस वाहतुक करणारी वाहनांने थांबवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी असणारे अंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, संभाजी निंबाळकर, वैभव कोळी यांना शहापूर पोलिसांनी यड्राव फाटा येथून ताब्यात घेत अटकाव केला. त्यानंतर पोलिस ठाण्यात नेत त्यांना समज दिला. तर पंचगंगा कारखाना प्रशासनातील अधिकार्‍यांना बोलावून त्यांनाही शेतकर्‍यांच्या भावना सांगून ऊसतोडी व वाहतुक बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर रात्री उशीरा आंदोलनकर्ते यांना सोडून देण्यात आले.
यड्राव (ता. शिरोळ) येथील फाट्यावर रात्री 10.30 वाजता शिरोळ, दत्तवाड, दानोळी, यड्राव, टाकळीवाडीसह शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व तरूण शेतकर्‍यांनी पंचगंगा व जवाहर साखर कारखान्याची होणारी 25 ते 30 ट्रॅक्टरची ऊस वाहतुक रोखुन धरली. व ट्रॅक्टरमधील हवा सोडून देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आंदोलक व पोलिसांच्यामध्ये शब्दाकी चकमक उडाली. या आंदोलनामुळे सुमारे 2 किमी पर्यंत वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.

प्राधान्याने दर जाहिर करून ऊसतोडी देणे बंधनकारक असताना ऊसदर जाहिर न करता कारखानदार मग्रुरीने ऊसाची वाहतुक करीत आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊसाला 3500 रूपये दर परवडतो असे सांगितले असतानाही देखील कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाला रिकव्हरी जादा असूनही शेतकर्‍यांना समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे ऊसाला अधिक भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. त्यामुळे शेतकर्‍यांनी चालू गळीत हंगामात दर जाहीर झाल्यानंतरच आपल्या उसास तोडी घ्याव्यात.

– संभाजी निंबाळकर, वैभव कोळी, शेतकरी व आंदोलन अंकुश कार्यकर्ते


या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर अंकुशचे प्रमुख धनाची चुडमुंगे यांनी दर न जाहिर करता हे कारखानदार ऊसतोडी व वाहतुक करीत आहेत. दर जाहिर झाल्याशिवाय तोडी व वाहतुक करता येत नाही. असा शासनाचा जीआर दाखविला. यानंतर पोलिसांनी मध्यस्तीची भूमीका घेत पंचगंगा साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना बोलावून त्यांना समज दिला. व दर जाहिर झाल्यानंतरच ऊस तोडी व वाहतुक करण्याच्या सुचना दिल्या.