Spread the love

कुरुंदवाड / महान कार्य वृत्तसेवा
नुकताच विधानसभा निवडणूक पार पडली असून यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्याचे संकेत समोर येत आहेत. सुरूवातीला महापालिका व नगरपरिषदेच्या निवडणुका होणार असल्याने कुरूंदवाड नगरपरिषदेची निवडणूक शिंदे शिवसेनेकडून लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.
शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना अशा दोन शिवसेना अस्तित्वात आल्या. विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेने समाधानकारक यश मिळवल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच माध्यमातून कुरूंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत सहभाग घेवून शिंदे शिवसेना नगरपरिषदेच्या प्रशासनाचा कारभार हाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने कुरूंदवाडमध्ये शिंदे शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.