Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी फोनाफोनी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांना फोन करून धन्यवाद देत सोमवारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले. सोमवारी दुपारी 4 वाजता माने राजधानीकडे रवाना होणार आहेत.
लोकसभेत दमदार यश मिळाले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून 40 हजाराचे मताधिक्य मिळाले. यासाठी जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांनी चांगल्या जोडण्या लावल्या होत्या. याच आधारावर त्यांनी विधानसभा लढविण्याची तयारी केली होती. परंतू, इचलकरंजीची जागा भाजपला सुटल्याने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून रविंद्र माने यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीची सत्ता आल्यास मोठी संधी देण्याचा शब्द दिला होता. रविवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांनी रविंद्र माने यांना दुरध्वनीवरून डॉ. राहुल आवाडे यांच्या विजयाबद्दल धन्यवाद दिले. तसेच सोमवारी सायंकाळी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित रहा, असा संदेश दिला. आता पहावे लागेल रविंद्र माने यांना कोणती मोठी संधी मिळते.