Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
महायुतीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे रविवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सोमवारी सकाळी ते अजितदादांची भेट घेणार आहेत. चोपडे यांनी अपक्ष निवडणूक लढविली असलीतरी शहर जिल्हाध्यक्ष पदावरून तर्क-वितर्क लढविले जात होते.
विठ्ठल चोपडे यांच्या रिक्त जागी बाळासाहेब देशमुख यांना नियुक्तीपत्र दिले होते. परंतू, ही निवड ही वादाच्या भोवर्‍यात सापडलेली होती. त्यामुळे आता पुन्हा विठ्ठल चोपडे यांना राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्षपद देवून पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित चोपडे दादांच्या भेटीला गेले असावेत, असे कळते.