संतोष पाटील : महान कार्य वृत्तसेवा
निवडणूक ड्यूटीवर असणारे कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रामध्ये पोहोचविण्यासाठी एसटीच्या 451 बस रवाना होणार आहेत. परिणामी दुपारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी सेवा विस्कळीत होणार आहे.
विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे. बुधवारी मतदान होणार आहे. 3 हजार 452 मतदान केंद्र आहेत. हजारो कर्मचारी, अधिकार्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. हे सर्व कर्मचारी मंगळवारी सकाळी 7 वाजता संबंधित मतदार संघातील निवडणूक कार्यालय येथून मतदानासाठीचे ईव्हीएम मशिनासह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले.
या एसटीच्या बस सकाळी कर्मचारी आणि साहित्य केंद्रावर पोहोचवून दुपारी पुन्हा डेपोत येणार आहेत. एसटीच्या सुमारे 731 बस आहेत. यापैकी एकाचवेळी 451 बस निवडणूक कामासाठी गेल्या मंगळवारी दुपारी 2 पर्यंत एसटीची सेवा विस्कळीत होणार आहे. प्रवाशांनी पर्याय वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागणार आहे.