हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
दलितमित्र अशोकराव माने बापू यांना गत विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी जनसुराज्यची उमेदवारी देण्यात आली. तरीही त्यांनी निखराची झुंज देत 3 नंबरची मते मिळविली. बापूंना यंदा आमदार करायचंच, अशी खूनगाठ बांधत कार्यकर्त्यांनी अक्षरश: रात्रीचा दिवस करुन जोडण्या लावल्या.
दलितमित्र अशोकराव माने बापू देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचे सच्चे पाईक म्हणून ओळखले जातात. राजकारण, समाजकारण करत असताना त्यांनी कधीही रत्नाप्पाण्णांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. गत विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही न खचता त्यांनी भान ठेवून बेभानपणे काम केले. कोणतेही पद, सत्ता नसताना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात फुल ना फुलाची पाकळी रुपाने निधी देऊन विकासकामांना प्राधान्य दिले. मतदार संघात असं एकही गाव नाही, ज्या ठिकाणी बापुंचे कार्य पोहचलेले नाही. हा माणूस आमदार झाला तर मतदार संघाचा कायापालट होईल. यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: रात्रीचा दिवस केला आणि बापूंचं कार्य घराघरात पोहचविलं. जोडण्या लावल्या हे त्यांच्या प्रचारादरम्यान, दिसून आलं.
विशेष म्हणजे दलितमित्र अशोकराव माने हे बारशापासून ते मयतापर्यंत आणि छोट्याशा कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी बापूंनी लावलेली हजेरी यामुळे आपल्या कुटूंबातीलच एक सदस्य आहेत, अशी लोकभावना निर्माण झाली आहे. सध्या त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करुन जोडण्या लावण्यास सुरुवात केली असून त्यांच्या विजयासाठी झाडून सारे कार्यकर्ते अतिशय तळमळीने काम केले. आता पहावे लागेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या जोडण्या बापूंच्या विजयासाठी कितपत कामी येतात.
सुहासने निभावली मोठी जबाबदारी
सुहास राजमाने म्हणजेच अशोकराव माने बापू अशी मतदार संघात ओळख आहे. त्यामुळे बापूंच्या प्रचार यंत्रणेची मोठी जबाबदारी सुहास राजमाने यांनीच हाताळली. त्यांच्या साथीला डॉ.अरविंद माने, डॉ.निता माने या होत्याच. परंतु प्रचारादरम्यान सुहासने राबविलेली यंत्रणा महत्वपूर्ण ठरली.