Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

पदयात्रा, मेळावे, कॉर्नर सभा असा धडाका लावून प्रचारात मुसंडी घेणाऱ्या अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी आज घरोघरी मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचाराची अनोखी सांगता केली. शिट्टी चिन्ह घरोघरी पोहोचल्याने आणि मतदारांनी अपक्ष उमेदवारी उचलून धरल्याने मतपेटीतून धक्कादायक निकाल येणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विठ्ठल चोपडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत भागाभागात पदयात्रा, मेळावे, कॉर्नर सभा घेऊन शिट्टीचिन्ह घरोघरी पोहोचवले. पाणी प्रश्नावरून रान उठवले. इचलकरंजीत विठ्ठल चोपडेच पाणी आणू शकतात, याची आता खात्री नागरिकांना झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतपेटीतून निश्चित चमत्कार घडणार असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. इचलकरंजीत दोन धनदांडगे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराहून काकणभर सरस यंत्रणा राबवत विठ्ठल चोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी  शिट्टी चिन्हाचे जोरदार वातावरण तयार केले आहे. 

आज प्रचाराची सांगता असताना शक्तीप्रदर्शन न करता विठ्ठल चोपडे यांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी थेट मतदारांशी संवाद साधला. इचलकरंजीचा पाणी प्रश्न विठ्ठल चोपडेल सोडवू शकतात, याची खात्री कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांना दिली. त्यामुळे शिट्टी चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न चोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची सांगता होईपर्यंत केला. विठ्ठल चोपडे यांचे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे शिट्टी चिन्हाचे जोरदार वातावरण तयार झाले असून कोणताही दगा फटका विरोधकांकडून होऊ नये, म्हणून कार्यकर्ते सजग आहेत. भागाभागात विरोधकांच्या हालचालीवर कार्यकर्ते नजर ठेवून आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात सकारात्मक वातावरण मतांमध्ये बदलण्यासाठी कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागले आहेत. येत्या निवडणुकीत मतपेटीतून चमत्कार घडणार व शिट्टी वाजणार, असे वातावरण तयार झाले आहे.