Spread the love

संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा

आमदार प्रकाश आवाडे यांनी किती बेकारांना काम दिले. त्याचा जाब विचारला पाहिजे. बेकारी वाढल्याने गुन्हेगारी वाढली असून हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी येथे बोलताना केले. 

विठ्ठल चोपडे म्हणाले, रस्ते गटारी करून शहराचा, मतदारसंघाचा विकास होत नाही. ज्या प्रमाणात मुले शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, त्या प्रमाणात नोकऱ्या नाहीत. त्यामुळे मुलांच्या मध्ये नैराश्य आले आहे. याचा विचार माता पित्यानी करून या निवडणुकीत परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी भागातील महिलांनी विठ्ठल चोपडे यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले व त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मुलांना काम नाही, बेकारी वाढली आहे. मुले वाममार्गाकडे वळत आहेत. त्याचा परिणाम समाजावर होत आहे. याबाबत विद्यमान आमदार एक शब्द बोलत नाहीत. निव्वळ जातीवादाचे भूत उभा करून मते मिळवण्याचा उद्योग त्यांचा आहे. हा डाव हाणून पाडणार असून त्यासाठी चोपडे यांनाच मतदान करणार,असे अभिवचन महिलांनी यावेळी दिले..