Spread the love

इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील गृह मतदान गुरुवार दि.१४ नोव्हेंबर ते शनिवार दि.१६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत ८५ वर्षांवरील जेष्ठ आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात दि.२९ ऑक्टोबर अखेर एकुण ३,१२,६६४ इतके मतदार संख्या आहे. यामध्ये १,५८,७२१ पुरुष मतदार तर १,५३,८८१ इतके स्त्री मतदार असुन ६२ इतर  मतदार आहेत. यापैकी १८ ते १९ या वयोगटातील  ६२९९ इतके नवमतदार आहेत.  सैन्य दलात कार्यरत असलेले एकुण १५९ मतदार असुन यापैकी १५२ पुरुष मतदार तर ७ स्त्री मतदार आहेत.मतदारसंघांमध्ये ८५ पेक्षा जास्त वय असलेले एकुण १९७३ मतदार असुन त्यापैकी १९४ मतदार गृह मतदाना साठी इच्छुक आहेत. तसेच मतदारसंघात एकुण ५४२  दिव्यांग असुन  त्यापैकी ३५  मतदार गृह मतदानासाठी इच्छुक आहेत.

गृह मतदानासाठी एकुण १४ पथके तयार करण्यात आलेली असून त्यापैकी दोन राखीव आहेत.तरी गुरुवार पासून  गृह मतदानासाठी आपल्या घरी येणाऱ्या गृह मतदान पथकास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.