Spread the love

लुटारू टोळीने घेतला फायदा

कोल्हापूर : महान कार्य वृत्तसेवा
राज्यात एका बाजूला विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी पोलिसांपासून शासकीय यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे. असे असताना दुसर्‍या बाजूला पोलीस व्यस्त असल्याचा ङ्गायदा आता काही लुटारू टोळी घेताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक उभे करण्यात आले आहेत. याचा ङ्गायदा एका लुटारू टोळीने घेतला.
शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून शासनाच्या तपासणी नाक्याच्या आधीच काही अंतरावरच बोगस पथकाने एका व्यावसायिकाची 25 लाख 50 हजारांची रोकड लांबविली आहे. हा प्रकार मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. माहिती कळताच पोलिसाची 5 पथके संशयितांचा शोध घेण्याकरिता रवाना करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, ङ्गिर्यादी सुभाष लक्ष्मण हारणे (वय 50, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) हे व्यापारी आहेत. ते यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. ते रोजच्या प्रमाणे सोमवारी काम केलेल्या कामाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या 5 ते 5:20 च्या सुमारास कारमधून तावडे हॉटेलच्या दिशेने आले. पहाट असल्याने अजून अंधार होता. दरम्यान, 25 ते 30 वयोगटातील अज्ञात पाच जणांच्या टोळीने सुटबुट घालत आणि शासकीय अधिकार्‍यांचे नकली ओळखपत्र गळ्यात अडकवून सर्व्हिस रोडला हारणे यांची कार अडवली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी सुरू असल्याचे सांगत कारची तपासणी करणार असल्याचे सांगितले. दोघा-तिघांनी कारची झडती सुरू केली. त्यावेळी गाडीत 25 लाख 50 हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकार्‍यांच्या हाती लागली.
आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी कारवाईची भीती दाखवली. हारणे यांनी त्यांना हे आपल्या व्यवसायाचे पैसे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या टोळक्याने त्यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने घेऊन गेले. तिथे त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल काढून घेऊन पसार झाले. या सर्व घटनेनंतर आपली ङ्गसवणूक झाल्याचे हारणे लक्षात येताच त्यांनी थेट गांधीनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेली हकीकत सांगून तक्रार दाखल केली.
जिल्ह्यात दीडशेहून अधिक तपासणी पथके शहरांच्या वेशीवर 24 तास काम करत आहेत. तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच एक अधिकृत स्थिर तपासणी पथक आहे. मात्र त्याच्या अलीकडेच महामार्गाच्या पलीकडेच सर्व्हिस रोड लगत तिथून थेट बोगस शासकीय अधिकारी बनत तोतया टोळीने केलेल्या सिनेस्टाईल या लुटीमुळे पोलीस दलात आणि शासकीय अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तपासाच्या सूचना देत गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पाच पथके तपासासाठी रवाना झाली. मात्र, या लूटमारच्या प्रकारामुळे सध्या व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी संशयित गाडीची ओळख पटली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. गाडी आणि लूट करणारी टोळीतील संशयितदेखील कोल्हापुरातीलच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच एलसीबी आणि गांधीनगर पोलीस ठाण्याची गुन्हे शाखा अन्वेषणची टीम वेगाने तपास करत आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ङ्गूटेज ताब्यात घेण्यात आले आहेत.