Spread the love

कोल्हापूर : महानकार्य वृत्तसेवा-

दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा जपण्याच्या उद्देशाने सोळांकुर (ता.राधानगरी) येथील “सौजन्य स्पोर्ट्स” आयोजित किल्ला बनवा स्पर्धा २०२४ ही स्पर्धा घेण्यात आली होती. गावातील लहान मुलांनी दिवाळीत एकत्र येऊन विविध किल्ले साकारले होते. या स्पर्धेमध्ये गावातील २० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी प्रतापगड, तोरणा, जंजिरा, पुरंदर, रायगड, मल्हारगड, भुदरगड आणि पन्हाळा, असे विविध प्रकारचे किल्ले बनवले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्तेच्या यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथम परितोषिक: शंतनू पाटील, सुदर्शन पाटील. द्वितीय परितोषिक: संदेश पाटील, विशाल पाटील, तृतीय पारितोषिक: असद तहसीलदार, राजवर्धन परीट, रुद्र धावरे यांनी प्राप्त केला.  स्पर्धा अनुक्रमे ( १००१, ७०१, ५०१) व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे होते  त्याचं बरोबर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि गड किल्ल्यावर आधारित माहिती पुस्तके देण्यात आली. परीक्षक म्हणून योगेश चौगुले व निशिकांत मुधोळकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अष्टविनायक मंदिर, सोळांकूर येथे पार पडला.

यावेळी अक्षय पाटील, सुधीर निचिते, ओंकार कारेकर, नरेंद्र आडके, सुजित पाटील, रणजित मुधोळकर, सचिन मांजरेकर, संतोष मुधोळकर, सुशांत पाटील, अमोल मुधोळकर, सौरभ पाटील, अनिकेत लोहार, आकाश जाधव, पार्थ सुतार, राहुल हरणे, उपस्थित होते. आभार गणेश पाटील यांनी मानले.