कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राजेश लाटकर यांना विजयी करण्याचा, निर्धार
कोल्हापूर : महानकार्य वृत्तसेवा-
माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती, यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं. लाटकर यांना, मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती हे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. मालोजीराजे यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय त्यांनी जाहीर केला.. नवीन राजवाड्याच्या ठिकाणी रविवारी हा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे प्रमुख उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या अचानक माघारीच्या निर्णयाने कोल्हापूरात खळबळ उडाली होती.
मात्र त्यांनी माघार का घेतली, याबाबतची भुमिका लवकरच जाहीर करणारं असल्याचंही माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं होतं. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीने राजेश लाटकर यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. या सर्व पार्श्भूमीवर मालोजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, संपन्न झाला. यावेळी बोलताना माजी आमदार मालोजीराजे यांनी, सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी. अशी भावना सुरवाती पासूनच खासदार शाहू महाराज यांची होती.
मात्र कार्यकर्त्यांचा आग्रहामूळ आम्ही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक घडामोडीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून लाटकर यांना आमदार करण्याची भावना खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं त्यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजीराजे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आता सक्रिय होतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसच कोल्हापूर उत्तर मतदारसंघात लाटकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते ताकतीने प्रचारात उतरतील. असही माजी आमदार मालोजीराजे यांनी जाहिर केल.